Share

जितेंद्र आव्हाडांविरुद्ध शिवसेनेच्या नेत्यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे तक्रार

Published On: 

मुंबई : एकीकडे काँग्रेस स्वबळाची भाषा करत असताना, शिवसेना आणि राष्ट्रवादीत बिनसत असल्याचे चित्र आहे. त्याला कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड. आव्हाड हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने शिवसेनेवर कुरघोडी करायला पाहात असतात. यामुळे शिवसेनेचे नेते त्यांना वैतागले आहेत.

आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केल्यानंतर टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याच्या आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली होती.

यानंतर आता पुन्हा शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा संघर्ष परत एकदा सुरू झाला आहे. शिवसेना आमदारांनी जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या कार्यशैलीवर शिवसेना नेते, आमदार आणि मंत्री नाराज आहेत. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी आमदार विनोद घोसाळकर,राहुल शेवाळे, सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. ‘टिव्ही ९’ ने याबाबत वृत्त दिले आहे.

तक्रारीत नेमके काय म्हटले आहे आणि त्याचा तपशील काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाहीये. पण सदनिका स्थगित करण्याच्या निर्णयानंतर आव्हाड नाराज झाले होते. यानंतर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या अखत्यारित येत असलेल्या विभागामार्फत शिवसेनेचे अनेक कामांना ब्रेक लावल्याचा आरोप होत आहे. याच अनुशंगाने त्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!