Share

Anil Bonde | “पीएफआय संघटना आणि रझा अकादमीवर बंदी घाला”; राणांना आलेल्या धमकीवरून अनिल बोंडेंची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या जीवाला धोका आहे. राजस्थानच्या सीमेवरून आलेल्या काही लोकांनी राणा दाम्पत्याच्या घराची रेकी केली आहे असे सांगत खासदार नवनीत राणा यांना पत्र लिहून त्यांच्या एका हितचिंतकाने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. नवनीत राणा यांनी अमरावती येथील मेडिकल स्टोअर मालक उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा सुरु आहे. यावरच आता भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देत पीएफआय संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

अनिल बोंडे म्हणाले कि, “उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर अमरावतीमधील नागरिकांच्या मनात एका प्रकारची भिती निर्माण झालेली आहे. हे वातावरण शहरातील समाजात सलोखा टिकवण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पी.एफ.आय. संघटनेवर आणि रझा अकादमीवर बंदी घालण्याची गरज आहे.” तसेच पुढे ते असेही म्हणाले कि, “उमेश कोल्हेंच्या हत्येप्रकरणी पी.एफ.आय. संघटनेच्या संदस्यांची चौकशी करण्यात आली होती. तेव्हापासून अशा संघटनांकडून भीतीचे आणि अशांततेचे वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे.”

नितेश राणेंची प्रतिक्रिया
नवनीत राणा यांना धमकी देण्यात आली असली तरीही त्यांचं कुणीही काहीही बिघडवू शकत नाही, कारण त्यांच्या नावातच ‘राणा’ आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

पत्रात काय म्हटले आहे
हितचिंतकाने नवनीत राणा यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले, “नमस्ते मॅडम, मी तुम्हाला माझे नाव सांगू शकत नाही. मी तुमच्याच शहरातील सामान्य नागरिक आहे. मी तुम्हाला सावध करू इच्छितो की तुम्ही थोडे सावध रहा. कारण काही लोक तुमच्या मागे लागले आहेत. तुम्ही मला अनेक गोष्टींमध्ये मदत केली आहे. मी सरकारी नोकर आहे. तुम्ही माझी बदली केली आणि कोरोनाच्या वेळी माझ्या वडिलांना खूप मदत केली. मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की राजस्थान सीमेवरून काही संशयित लोक अमरावतीत आले आहेत. ते तुमच्या घरीही आल्याची माहिती मला मिळाली आहे. मी अल्लाहला प्रार्थना करेन की तुमच्यासोबत काहीही अनुचित प्रकार घडू नये आणि तुम्ही अशाच सर्वोच्च पदावर जावे. खुदा हाफिज”, असे हितचिंतकाने पत्रात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!