🕒 1 min read
पुणे : पुण्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच गौर गायकवाड मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पुणे ग्रामीण भागात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने महिला सरपंचाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित घटना ही पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात घडली होती.
संबंधित घटनेचा थरार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. किरकोळ वाद झाल्यानंतर मध्यस्थी करणाऱ्या महिला सरपंचाला मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. सुजित सुभाष काळभोर (रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी याचा निषेध करून आरोपीला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती.
दरम्यान महिला सरपंचाला मारहाण प्रकरणावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, ‘गृहखातं ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकाऱ्यांना गलीच्छ शिवीगाळ करणे त्यांना ॲट्रोसिटीच्या धमक्या देणे महिला सरपंचाला मारहाण करणे याचं लायसन्स दिलयं का ?? मुख्यमंत्री महोदयजी हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळ्याच गोष्टी दीर्घकाळ बंद ठेवायला लागू नये म्हणूनच तर आम्ही…’; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं
- आमच्या दंडाशी बरोबरी करू नका, आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्हीही असतो- संजय राऊत
- शिवसेना बैलगाडा मालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी; संजय राऊतांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
- ‘राज्यपाल हे पॉलिटिकल एजंट, भाजपला हवे तेच ते करतात’, संजय राऊतांची वादग्रस्त टीका
- पंडित नेहरुंशी वैर का?; ‘राऊतांचा सामना’तून रोखठोक सवाल


