मुंबई: सध्या एनसीबीकडून आर्यन खान ड्रग्स प्रकरणी तपासणी सुरु आहे. याबाबत रोज नवंनवीन खुलासे होत आहेत. आता यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर निशाना साधला आहे.
प्रश्न शाहरुख खान किंवा त्यांच्या पुत्राचा नसून केंद्रीय तपास यंत्रणांच्या चारित्र्य दर्शनाचा आहे. पैशासाठी व राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी, स्वतःच्या पार्श्वभागाचा कंडू शमविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा असा वारक धिक्कारार्ह आहे. राज्यांच्या स्वातंत्र्यावर, हक्कांवर हे आक्रमण आहे. केंद्रीय तपास यंत्रणा, एनसीबीचे अधिकारी राज्यात येऊन खोटी प्रकरणे करतात, लाचखोरी करतात व त्यांना जाब विचारणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाचे लोक देशद्रोही, असहिष्णू ठरवतात. हा नादानपणा असल्याचे संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
दरम्यान खोटी प्रकरणे करून काळा पैसा व प्रसिद्धी दोन्ही मिळवायचे असा हा जोडधंदा सुरू झाला आहे. आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची तोडबाजी तर मग मुंद्रा पोर्टवरील 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? हा सवाल लोकांच्या मनात आला असेल तर तुम्ही काय करणार? असाही सवाल आजच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- ‘ते’ प्रकरण हिमनगाचे एक टोक, मालक व नोकरांनी सावध राहावे; राऊतांचा इशारा
- गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार; सत्यपाल मलिकांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

