Share

नवाजुद्दीन सिद्दीकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! केली ‘ही’ कामगिरी

Published On: 

मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अनेक पुरस्कारही नवाजुद्दीने जिंकलेले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीला मिळालेल्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे. आता या यादीत आणखी एका प्रतिष्ठेच्या पुरस्काराची भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय किर्तीचा फ्रेंच रिव्हिएरा या चित्रपट महोत्सवामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला हा पुरस्कार मिळाला आहे.

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता व्हिन्सेंट डी पॉल यांच्या हस्ते नवाजुद्दीन सिद्दीकीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवाजुद्दीनला हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळणे ही भारतासाठी एक अभिमानाची बाब आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळायची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अनेक वेळा त्याला पुरस्कार मिळाले आहेत. फ्रेंच रिव्हिएरा या चित्रपट महोत्सवामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी सहभागी झाला. महोत्सवामध्ये जगभरातील कलाकारांना त्याने प्रेमळ मिठी मारली. एका फोटोमध्ये नवाजुद्दीन हा प्रसिद्ध तुर्की अभिनेता कान्सेल एलसिनला मिठी मारताना दिसत आहे.

कान्स चित्रपट महोत्सवात देखील नवाजुद्दीनची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवाजुद्दीन आता आगामी काही चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ आणि ‘नूरानी चेहरा’ या चित्रपटांमधून नवाजुद्दिन मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!