नागपूर : संभाजीराजे यांची महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेच्या सहाव्या जागी निवडून येण्यासाठी जोरदार धडपड सुरु आहे. शिवसेनेकडून संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे, मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी मिळणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे.
संभाजीराजेंनी मात्र ही ऑफर नाकारली. तसेच शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम असताना पाहायला मिळते. या पाश्वर्भूमीवर आता संभाजीराजे शिवसेनेत येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात शिवसेना नेते उदय सामंत यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपले मत मांडले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

