Share

‘पांडे बुवा’ सारखे पळपुटे महाराष्ट्राने पाहिले ; अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर टीका

Published On: 

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत त्यांचा विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला होता. दरम्यान आज मनसे नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा फोटो ट्विट केला. तसेच शरद पवारांनी राज ठाकरे यांच्या विरोधात रसद पुरवल्याचा आरोप केला आहे. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार अमोल मिटीकरी यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

“पवार साहेबांचे जुने फोटो ट्विट करणाऱ्यांना राजकीय ‘मंकीपॉक्स’ नावाचा आजार झालेला आहे. या आजारापासून महाराष्ट्राने सावध रहावे. काही ‘मंकी’ मर्कटचाळे सोडणार नाहीत. ‘पांडे बुवा’ सारखे पळपुटे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलेत,” असा टोला मिटकरींनी लगावला आहे.

महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा राज ठाकरेंनी केला होता आरोप

राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले होते. पण अयोध्या दौऱ्याच्या १५ दिवस आधी २० मे रोजी राज ठाकरे यांनी ट्विट करून आपला अयोध्या दौरा तूर्तास पुढे ढकलला होता. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलल्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 22 मे रोजी पुण्यातील एका जाहीर सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी दावा केला की, भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर विरोध सुरू केला. यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. मात्र रसद कुणी पुरवली हे राज ठाकरेंनी सांगितले नव्हते.

रोहित पवारांनी देखील मनसेवर निशाणा साधला

शरद पवारांवर रसद पुरवल्याचा आरोप झाल्यानंतर रोहित पवारांनी मनसेवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, “राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खासदार ब्रिजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!