मुंबई: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सुपरनोव्हास संघाने महिला टी २० चॅलेंज स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात वेलोसिटी संघाला १५० धावांचे लक्ष्य दिले आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीला वेलोसिटी संघाची कर्णधार दीप्ती शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सुपरनोव्हास संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिले तीन गडी लवकरच गमावले. मात्र त्यानंतर तानिया भाटिया (३६ धावा) आणि कर्णधार हरमंप्रीत कौर (७१ धावा) यांनी संघासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यादरम्यान हरमनप्रीत कौरने महिला टी २० चॅलेंज स्पर्धेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर सुन लुस हिनेही चांगली खेळी करत २० धावा केल्या व संघाची धावसंख्या १५० वर पोहोचवली. वेलोसिटी संघाकडून गोलंदाजी करताना कॅट क्रॉस तिने सर्वाधिक दोन गडी बाद केले. तर कर्णधार दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना प्रत्येकी १-१ गडी बाद करण्यात यश आले.
Innings Break!
Captain @ImHarmanpreet's 7⃣1⃣ powers Supernovas to 150/5. ???? ????
The Velocity chase to begin soon. ???? ????
Scorecard ???? https://t.co/ey7pHvLcGi #My11CircleWT20C #SNOvVEL pic.twitter.com/fSgRvPVi4d
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
दोन्ही संघांची Playing 11
सुपरनोव्हास – डिआंड्रा डॉटिन, प्रिया पुनिया, सुन लुस, हरमनप्रीत कौर (कप्तान), हरलीन देओल, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), सोफी एक्लेस्टोन, अलाना किंग, व्ही. चंदू, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग.
वेलोसिटी- शेफाली वर्मा, नात्थाकन चंथम, लॉरा वोल्वार्ड, यस्तिका भाटिया (व.), दीप्ती शर्मा (सी), किरण नवगिरे, स्नेह राणा, राधा यादव, केट क्रॉस, अयाबोंगा खाका, माया सोनवणे
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

