🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सध्या मोठ्या राजकीय डावपेच घडून येत आहेत. आता मात्र राज्यसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीवरून सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. संजय पवार हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ही घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राऊत म्हणाले, “संजय पवार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. संजय पवार हे शिवसेनेचे पक्के मावळे आहेत. राज्यसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. सहाव्या जागेचा चॅप्टर आता बंद झाला आहे. संभाजीराजेंचा आम्ही नक्कीच सन्मान ठेवतोय, त्यासाठीच त्यांना शिवसेनेचे उमेदवार व्हा असा प्रस्ताव आम्ही ठेवला. पण त्यांना अपक्ष लढायचं आहे, निवडून येण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. जर कोणाकडे ही मतं असतील तर त्यांनी त्यांना निवडून द्यावं.”
संभाजीराजे अपक्ष लढणार आहेत तर त्यांच्याकडे मतांची काय योजना आहे ते आपल्याला माहिती नाही. आमच्याकडे जेव्हा संभाजीराजेंचा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही म्हटलं की, गादीचा सन्मान, छत्रपतींच्या वंशजांचा सन्मान ठेऊन शिवसेना तुम्हाला उमेदवारी देईल, पण तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा.
यापूर्वी शिवसेनेनं अनेकांना राज्यसभेची उमेदवारी दिली होती, पण त्यांना पक्षाचं सदस्यत्व दिलं नव्हतं असा युक्तीवाद संभाजीराजेंच्या समर्थकांकडून करण्यात येतो. यावर संजय राऊत म्हणाले, आम्ही कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. जे असे म्हणतात त्यांना कदाचित शिवसेनेचा इतिहास माहिती नसावा.”
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
