बीड : आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघावचा अटकपूर्व जामीन बीडच्या सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आघावच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद शुक्रवारी पूर्ण झाला होता. न्यायालयाने सोमवारी निर्णय देणार असल्याचे जाहीर केले होते. जामीन फेटाळण्याचा निर्णय देण्यात आला. यामुळे आघावच्या अडचणी वाढल्या आहेत.
चिंचपूर येथील देवस्थान जमीन घोटाळ्यात तब्बल १५ आरोपी झाले आहेत. यात बडतर्फ उपजिल्हाधिकारी डॉ. एन.आर.शेळके आणि उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील डॉ. एन.आर.शेळकेला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्याला गुरुवारी जामीन मिळाला आहे. यातील आरोपी असलेल्या उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याने अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बीडचे सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान न्यायालयाने आघाव याला अंतरिम जामीन केला आहे. शुक्रवारी या जामीन अर्जावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. यात वक्फ बोर्डाच्या वतीनेदेखील अजहर अली यांनी जामिनाला आक्षेप घेत बाजू मांडली. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर आदेश राखून ठेवले होते. सोमवारी न्या. आर. एस. पाटील यांनी हा जामीन अर्ज फेटाळला.
महत्त्वाच्या बातम्या
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ
- ‘आर्यनविरोधात कट रचला जातोय, त्याची अटक चुकीची’; रोहतगींचा न्यायालयात युक्तीवाद
- नाइट सूट’मध्ये करवा चौथ साजरा; रवीना टंडनचे फोटो व्हायरल
- महत्त्वाचा निर्णय! रेशन धान्यांसाठी यापुढे कोरोना लसीकरण सक्तीचे
- महिलांना ‘मिनी ट्रॅक्टर’ कधी मिळणार? समाजकल्याण विभागाला निधीची प्रतिक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
