Share

नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा; भाजपच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

Published On: 

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रुझ पार्टीवर केलेल्या छापेमारीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा कारवाई दरम्यान अटकेत आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरुन चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. या सर्व प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा करुन वेगळं वळण लागलं किंवा लावलं गेलं.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. ‘सकारी अधिकाऱ्यांना धमकावण्याचं कांड सुरु आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. मलिकांना जर सरकारी अधिकाऱ्यांना धमकावायचं असेल तर या पदाचा आधी त्यांनी राजीनामा द्यावा’, असं मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं आहे.

या प्रकारे सरकारी पदाचा असा दुरुपयोग करणं योग्य नाही. राज्यपालांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्ही दिलेलं निवदनही राज्यपालांनी स्विकारलं आहे. सरकारी पदाचा गैरफायदा घेणं थांबलं नाही तर भाजप आम्ही राष्ट्रपतींनाही भेटू. आता राज्यपाल या निवदेनावर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे, असंही मंगल लोढा म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!