पणजी: गोवा विधानसभेच्या (Goa Elections) पार्श्वभूमीवर पणजीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) आणि प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी गोव्याचे प्रदेश सरचिटणीस अनिल झोलापुरे आणि गोवा प्रदेश प्रवक्ते अविनाश भोसले उपस्थित होते. यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
गोव्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गोव्याची निवडणूक लढवत आहोत. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. गोव्याच्या जनतेने २०१७ च्या निवडणुकीत भाजपला नाकारले होते. काँग्रेसच्या पारड्यात बहुमत होते. त्यानंतर सत्ता मिळाल्यानंतरही भाजपने गोव्यातील जनतेला न्याय दिला नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.
गोव्यातील बेरोजगारीवर बोलताना मलिक म्हणाले, सत्ता राबवत असताना भाजपने चुकीची धोरणे राबविल्यामुळे गोव्यातील पर्यटन कमी झाले आहे. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून सत्तेत आल्यास नवे पर्यटन धोरण राबविण्यात येईल, जेणेकरुन रोजगार वाढतील, असे आश्वासन मलिक यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सोनिया गांधींनी गेल्या अनेक वर्षांपासून भरला नाही PROPERTY TAX; RTI मध्ये खुलासा
- ‘भाजपने घराणेशाहीचा ढोल बडवणे बंद करावे’; नवाब मलिकांचे वक्तव्य
- माझा हिजाब आणि बुरख्याला विरोध आहे; पण… – जावेद अख्तर
- पहिल्या क्रमांकावर हिंदू हित म्हणजेच राष्ट्रहित- मोहन भागवत
- IND vs WI: दीपक हुड्डासाठी ‘हा’ ठरला अविस्मरणीय क्षण; म्हणाला, “लहानपणीचे स्वप्न..”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

