Ajit Pawar | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांच्यानंतर आता पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिवरायांची तुलाना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील व्यासपीठावर होते. लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची तुलना एकनाथ शिंदे यांच्यासोबत केली आहे. यामुळे महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाचाळवीर मंत्र्यांना फटकारले आहे.
“वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो आहे. तरी देखील यांच्या मनामध्ये काहीना काही कल्पना अशा येतात ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी एक भूमिका देखील या लोकांना कळत नाही. एखाद्याला ठेच लागली की दुसरा ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करत असतो. हे तर यांच्यात दिसतचं नाही. उलट चढाओढ लागलेली दिसते, अशी टीका अजित पवार यांनी केली.
एकाने चूक केली की मग दुसऱ्याला बोलायला संधी मिळाली की, तो चूक करतो, पुन्हा तिसरा चूक करतोय. हे कधी थांबणार आहे? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.
एकनाथ शिंदे स्टेजवर असातानाच त्यांच्या देखतच तुलना केली. आपण कोणाशी तुलना करतोय, काय करतोय आपल्याला जबाबादरी काय, आपण कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे याचा विचार करावा. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशी होऊ शकते का? हे महाराष्ट्रात कधी घडलंय का? याचेही तारतम्य या लोकांना राहिले नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुका लागू दे…जनता यांना योग्य जागा दाखवेल, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले लोढा-
आज 363 वा शिवप्रताप दिन (Shiv Pratap Day) आहे. त्यानिमित्त प्रतापगडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या बंडांची छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा सुटकेशी तुलना करण्यात आली आहे. शिवराय आग्रामधून बाहेर पडले तशे शिंदे बाहेर पडले, असे लोढा म्हणाले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसे एकनाथ शिंदे यांनी देखील कोणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले एकनाथ शिंदे महाराष्ट्रसाठी बाहेर पडले, असे वक्तव्य मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांवर अजित पवार भडकले ; म्हणाले,
- Amol Mitkari | “मंगल प्रभात लोढा यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले” ; अमोल मिटकरी यांची टीका
- Mangalprabhat Lodha | मंगलप्रभात लोढा यांचं शिवरायांबाबतच्या केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, म्हणाले…
- Aditya Thackeray | लोढांकडून शिवरायांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंशी, आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
- Eknath Shinde | “शेतकरी हेलिकॉप्टरने शेती करायला जाऊ शकत नाही का?”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

