Share

Sanjay Raut | “राज्यपाल अजूनही राजभवनात कसे?”; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

 Sanjay Raut | मुंबई : आज सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना शिवरायांना अभिवादन करण्याचा हक्क नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले,  “छत्रपती शिवाजी महाराजांचा जल्लोष नेहमी होतो. शिवप्रताप दिनाचे महत्व समजून घ्या. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली असती. तर आजच्या शिवप्रताप दिनाचे महत्व अधिक वाढले असते.”

महाराष्ट्राचा आणि शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजभवनात कसे?, असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलाय. मुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत. शिवरायांचा अपमान करुन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील त्यांच्या जाग्यावर बसले आहेत. हे लोक त्यांचे समर्थन करतात. अशा मुख्यमंत्र्यांनी गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना गडावर जाऊन अभिवादन करण्याचा अधिकार नाही”, असंही संजय राऊत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!