मुंबई : ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून जे मराठा आरक्षण आहे ते अतिरिक्त आरक्षण दिले पाहिजे ही पहिल्यापासून राज्य सरकारची भूमिका आहे. परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजप दोन्ही बाजुने खेळ खेळत आहे. त्यांनी कधी ओबीसी समाजाला, तर कधी मराठा समाजाला भडकवण्याचं राजकारण बंद करावं, असा स्पष्ट इशारा अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलाय
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे 16 टक्के आरक्षण योग्यच आहे तशी भूमिका केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात मांडावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर राज्य सरकारला अधिकारच नाही असा निकाल दिला आहे. संसदेत केंद्राने राज्याचा अधिकार अबाधित राहिल असे स्पष्ट केले होते. परंतु सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर केंद्राने फेरविचार याचिका दाखल केली आहे. मात्र ती महाराष्ट्रासाठी नसून इतर सर्व राज्यं तुटून पडणार असल्यानं दाखल केलीय.’ असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘मराठा आरक्षणाचा कायदा हा आम्ही आणला होता. उच्च न्यायालयात हा विषय गेला होता. पण न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पुन्हा हा निर्णय न्यायालयात गेला आणि त्याला स्थगिती मिळाली आणि आता तो रद्द झाला. या सरकारला मराठा आरक्षणाबद्दल कोणतेही गांभीर्य नाही. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेव्यतिरिक्त कोणतेही काम केले नाही, अशी टीका फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
तर, ‘महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. राज्यपालांना भेटून एक पत्र देऊन काही होत नाही. एका पानाचे निवेदन दिले आहे, त्यामुळे असा काही फरक पडत नाही. मराठा समाजाची फसवणूक आहे. उलट मोदींनी मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे, या सरकारकडे कोणताच प्रस्ताव नाही, आपल्या अंगावर आलेले काम झटकण्याचा प्रयत्न आहे, असा टोलाही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.
महत्वाच्या बातम्या
- गुजरातला एक हजार कोटीची मदत मग महाराष्ट्राला का नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल
- ‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर
- मोठी बातमी! केंद्राकडून ‘म्युकरमायकोसिस’चा साथरोग कायद्यात समावेश, नवीन नियम लागू
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या


