मुंबई : सोनी टिव्ही या वाहिनीवर ‘इंडियन आयडॉल’ चे बारावे सत्र सुरु आहे. या शोमध्ये परिक्षक म्हणून नेहा कक्कर काम करत आहे. गायीका नेहा कक्कर नेहमीच या ना त्या कारणाने सोशल मीडीयावर चर्चेत असते. सध्या तिचा एक जुना व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
‘इंडियन आयडॉल’ मध्ये परिक्षक होण्याआधी नेहाने याच शोमध्ये स्पर्धक म्हणुन सहभाग नोंदवला होता. काही वर्षापुर्वी जेव्हा नेहाने ‘इंडियन आयडॉल’साठी ऑडीशन दिले होते तेव्हाचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या ऑडीशनच्या वेळी नेहाने गायलेले गाणे ऐकुन तेव्हाचे परिक्षक अनु मलिकने तिला अशी काही प्रतिक्रिया दिली होती. ती पाहून सर्वजण हैराण झाले होते. अनु मलिक त्यावेळी नेहाला म्हणाला की ‘तुझा आवाज ऐकुन मला स्वत:च्या कानाखाली मारावेसे वाटत आहे.’
https://twitter.com/Mrs_Raavan_/status/1380559125160067081
परिक्षक अनु मलिकची ही प्रतिक्रिया ऐकून सर्वच हैराण झाले आहे. मात्र हा व्हिडीओ अर्धवट असल्यामुळे कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल असा सुर समाज माध्यमावर आहे. कारण अनु मलिक यांची या कार्यक्रमातील प्रतिक्रिया नेहमीच वादग्रस्त असते. ते नेहमीच गंभीर प्रतिक्रिया देतात, नंतर मात्र ती मस्करी असल्याचे समोर येते. मात्र या व्हायरल व्हिडीओतील अनु मलिकच्या प्रतिक्रियेमुळे नेहाचे चाहते नाराज झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पवार काय फडणवीस काय एकाच माळेचे मनी, कोरोना नियम सर्रास पायदळी तुडवी…!
- शेकापच्या वतीने महाविकास आघाडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
- समदची फलंदाजी पाहून इरफान पठाण पण झाला होता अवाक
- ‘सत्यशोधक’द्वारे महात्मा जोतीराव फुले यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर
- बप्पी लहरी यांची प्रकृती स्थिर ; हॉस्पिटल मधून मिळाला डिस्चार्ज!


