मुंबई – 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सीबीआय याच आठवड्यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावू शकते अशी माहिती समोर येत आहे.
याआधी अँटिलिया स्फोटक प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले सचिन वाझे, महेश शेट्टी बार मालकासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, तक्रारदार अॅडव्होकेट जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सीबीआय अधिकारी काल (11 एप्रिल) सचिन वाझे यांच्या दोन चालकांना DRDO मध्ये घेऊन आले होते. तर अनिल देशमुख यांचे खासगी सचिव एस कुंदन आणि संजीव पालांडे यांना बोलावण्यात आलं होतं. या सगळ्यांची 8 ते 10 तास चौकशी करण्यात आली.
दरम्यान, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी विरोधकांनी केली होती. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. हायकोर्टाच्या निर्देशावरून या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊन लागल्यास औद्योगिक क्षेत्राला बसणार मोठा फटका
- संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात
- राज्यात कडक लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक
- …तर माझे नाव बदला, देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर जोरदार प्रहार
- मोठी बातमी : राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

