Share

जे नेते स्वतःच्या पक्षाच्या नेत्याचे ऐकत नसतील त्यांचं लोकं किती ऐकतील ?

Published On: 

मुंबई – हे सरकार एका धर्माच्या विरोधात काम करत आहे असा भाजपचा आरोप असेल तर मग मोदीसाहेब बोलत आहेत ते सर्व धर्माच्या विरोधात बोलत आहेत का? सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे तो धुडकावण्याचे काम जनतेने करावे का? अशी भूमिका भाजप आमदारांची असेल तर त्यांना विधानसभेच्या सदस्यपदावर राहण्याचा अधिकार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मांडली आहे.

भाजप आमदांराच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे. जो सुप्रीम कोर्टाचा आदर करत नसेल… स्वतःच्या पक्षाच्या नेत्याचे ऐकत नसेल त्यांचं लोकं किती ऐकतील असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. देशाचे पंतप्रधान मन की बात मध्ये भविष्यात सण येत असताना गर्दी होणार नाही याची सरकारने काळजी घेतली पाहिजे असे सांगितले होते. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने सणासुदीला गर्दी करु नका याची दक्षता राज्य सरकारने घेतली पाहिजे असे निर्देश दिले होते असे असताना भाजपचे आमदार भडक वक्तव्य करत असल्यामुळे नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, एका बाजूला राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना दुसऱ्या बाजूला राज्यात दिवसभरात ४५०५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली तर ६८ जणांचा मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ७५६८ करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ६८ हजार ३७५ इतकी झाली आहे. राज्यात दिवसभरात अहमदनगर येथे ५७५, पुणे ३९८, पुणे मनपा १३९, पिंपरी चिंचवड ११८, सोलापूर ४०१, सातारा ५६५, कोल्हापूर ३३५, सांगली ४७८, सांगली-मिरज-कूपवाड १११, रत्नागिरी ११३, बीड येथे १६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!