🕒 1 min read
मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सध्या तुरुंगात असलेले महाविकास आघाडी सरकारचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. विशेष न्यायालयाने नवाब मलिक हे थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध होते. ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर न्यायालयाने सदरील निरीक्षण नोंदवले आहे. यावरच राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे.
दरम्यान नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी डी-गँगशी संबंध ठेवून कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यासंबंधी हसीना पारकर आणि त्यांचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्यात अनेक बैठका झाल्याची माहिती मिळत आहे.
तसेच याची दखल घेत न्यायालयाने नवाब मलिक आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी आणि सरदार शाहवली खान यांच्याविरुद्धची कारवाई पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले असून ईडीने आपल्या चार्टशीटमध्ये नवाब मलिक आणि सरदार शाहवली खान यांना आरोपी ठरवले असल्याचे समोर आले आहे. आता यावरूनच भाजपकडून राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…यामुळे राज्या-राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत”, संजय राऊतांनी सांगितले कारण
- तरुणांना काँग्रेस पक्षात आपले भविष्य दिसत नसेल तर कसे व्हायचे?; संजय राऊतांचा सवाल
- काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी- संजय राऊत
- “फिरलेली माथी ठिकाणावर आणण्यासाठी पुणे…”, ‘मनसे’चा इशारा
- “…वेळ आपल्या देशावर आलेली नाही याचं सर्व श्रेय बाबासाहेबांना जातं”, शरद पवारांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
