Share

खा.नवनीत राणांचे आदित्य ठाकरेंना पत्र; म्हणाल्या, ‘वडिलांकडे हट्ट करा, तरच ‘हे’ काम मार्गी लागेल’

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरून सध्या राणा दाम्पत्य आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहे. अशातच नवनीत राणा यांनी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य देवून लालफितीत अडकलेल्या विकासाला चालणा देण्याचा आग्रह केला आहे. त्यासाठी वडिलांकडे हट्ट केल्यास काम मार्गी लागणार असल्याचा सल्लासुध्दा त्यांनी दिला आहे.

‘आदित्यजी… आपण राज्याचे पर्यटन मंत्री आहात. मुंबई, ठाणे, कोकणमध्ये पर्यटनाचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जरा विदर्भाकडेही लक्ष द्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला दिले आणि मोठ्या गतीने या महामार्गाचे काम केले जात आहे. वाटत असेल तर अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यातील स्कायवॉकलाही माननीय शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, मात्र; काम लवकरात लवकर पूर्ण करा’, असे पत्र खासदार नवनीत राणा यांनी आदित्य ठाकरे यांना लिहिले आहे.

https://www.facebook.com/navneetkaurranaofficial/videos/225325552740108/

स्कॉयवॉकसाठी ३८ कोटींचा खर्च
चिखलदऱ्यात हजारो पर्यटक येतात. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिखलदरा येथे सिंगल केबलवरचा देशातील पहिला स्कायवॉक बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. सिडकोकडून त्याची उभारणी केली जात आहे. गोराघाट पॉइंट ते हरिकेन पॉईट दरम्यान ४०७ मीटर लांबीच्या या स्कॉयवॉकच्या उभारणीवर ३८ कोटी रुपये खर्च येणार आहे असे त्या म्हणाल्या. जून २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते पण त्याचे काम आज अर्धवट पडलेले आहे. या स्कायवॉकवर उभे राहुन पर्यटकांना चिखलदऱ्याचे अप्रतिम सौंदर्य न्याहाळता येईल. त्यावर असलेलया काचेच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून ५०० फुट खोल दरीचेही दर्शन घडणार आहे.

वन विभागामुळे काम रखडले
हे काम वन विभागाअंतर्गत येणाऱ्या वन व वन्य जीव मंडळाच्या कचाट्यात अडकलेले आहे. वनखाते सध्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे वडिलांकडे हट्ट धरून आपण हे काम मार्गी लावू शकता असे आवाहन राणा यांनी आदित्य यांना केले आहे. तसेच चिखलदऱ्यातील स्कायवॉकला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, पण त्याचे काम जलदगतीने करा अशी मागणी नवनीत राणांनी आदित्य ठाकरेंकडे पत्राद्वारे केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!