Share

राज्यात अनेक प्रश्न असून सरकारला केवळ मद्यविक्रीत रस- नवनीत राणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नवनीत राणा म्हणाल्या की,‘सध्या राज्यात अनेक समस्या असून त्या समस्यांकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. परंतु दुसरीकडे किराणा दुकानात वाईन विक्रीला सरकारने परवानगी दिली आहे. यावरून सरकारला केवळ मद्य विक्रीत रस असल्याचे दिसून येते. तरीही जर वेळ मिळालाच तर सरकारने राज्यातील इतर समस्यांकडे देखील लक्ष द्यावे’, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

दरम्यान, दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाईन व्यवसायात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांची एका बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यावर उत्तर देत राऊत म्हणाले की,‘आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी आणि चालवावी. तशी काही वायनरी असेल तर मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे. तसेच कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. सोमय्यांचा मुलगा काय चणे- शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्यांची मुलं काय रस्त्यावर केळी विकतात का? अमित शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?’,असा संतप्त सवालही राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!