🕒 1 min read
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. तत्पुर्वी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने अनेक विकासकामे हाती घेतली आहेत. मुंबईतील दुभाजक, पदपथांच्या कडेला दगडांची रंगरंगोटी करण्याचे काम सुरु आहे. मुख्य रस्त्याच्या आजू बाजूच्या भिंतीवर कलात्मक चित्रे पेंटीग करुन सुशोभिकरण करण्यात येत आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बेगमी म्हणून महापालिकेने आता दुभाजकांच्या रंगरंगोटीचा घाट घातला आहे. गेल्या २५ वर्षात हातात सत्ता असून दर्जेदार रस्ते बांधू न शकणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेच्या असल्या स्वस्तातल्या मेकअपला मुंबईकर कसेच भुलणार नाहीत.’ अशी टीका अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बेगमी म्हणून महापालिकेने आता दुभाजकांच्या रंगरंगोटीचा घाट घातला आहे.
गेल्या २५ वर्षात हातात सत्ता असून दर्जेदार रस्ते बांधू न शकणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेच्या असल्या स्वस्तातल्या मेकअपला मुंबईकर कसेच भुलणार नाहीत. pic.twitter.com/JgJ5XKVtga— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 31, 2022
रस्त्यांवरील दृश्यमानता वाढावी, पर्यायाने वाहनचालकांना सुरक्षितरितीने वाहन चालविता यावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, रस्ते परिसरांचे सुशोभीकरण व्हावे, यादृष्टिने वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे निर्देश पर्यटन, पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका बैठकीवेळी दिले होते. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांना सूचना केल्या.
रस्त्यांवरील मध्यवर्ती दुभाजकांची स्वच्छता करुन नव्याने रंगरंगोटी करणे, दुभाजक अस्तित्वात नसल्यास शक्य त्या रस्त्यांवर दुभाजक बांधणे, दुभाजकांमध्ये हिरवळ वा फुलझाडांची लागवड करणे, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करणे, प्रमुख रस्त्यांवरील आजुबाजूच्या भिंतीवर कलात्मक रंगरंगोटी करणे, चित्रं रेखाटणे इत्यादी कामे हाती घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सध्या मुंबई ठिकठिकाणी ही कामे सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या
-
‘खरा हिंदुत्ववादी असता तर जिन्नांना गोळी घातली असती, गांधीजींना का मारले ?; संजय राऊत यांचा सवाल
-
पुण्यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील ५६ टक्के बालकांना पहिला डोस
-
‘या’ महिन्यात होणार पुणे, पिंपरी–चिंचवड आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका
-
‘निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे’ बॅनर संतप्त महिला भाजप कार्यकर्त्यांनी फाडले..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
