🕒 1 min read
मुंबई : न्यूयॉर्क टाईम्सने केलेल्या दाव्यानुसार २०१७ मध्ये मोदी सरकारने संरक्षण सौद्याच्या पॅकेजमध्ये इस्त्रायलकडून पेगासस खरेदी केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून या प्रकरणावर भाष्य केले आहे. तसेच देशातील प्रतिष्ठत नागरिकांवर पाळत ठेवून त्यांना शत्रूसारखे वागवायचे ही कोणती रीत?, असा सवालही राऊतांनी केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘मोदी सरकार किती बेबंदपणे आणि मनमानी पद्धतीने वागत आहे याचे पेगॅसस हे उदाहरण आहे. आपल्याच देशातील प्रतिष्ठत नागरिकांवर पाळत ठेवून त्यांना शत्रूसारखे वागवायचे ही कोणती रीत? लोकशाहीचे हे अपहरण आहे. मोदींच्या मनात आले म्हणून त्यांनी अमर जवान ज्योत हटवली. त्यांच्या मनात आले म्हणून ऐतिहासिक संसद भवन बंद करून नवीन संसद उभारली. त्यांच्या मनात आले म्हणून सार्वजनिक उपक्रम, विमानतळे विकून टाकली. आता त्यांना भीती वाटते म्हणून ते आपल्याच लोकांवर जनतेच्या पैशांनी हेरगिरी करीत आहेत.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘लोकशाहीचा हा विनाश आहे. एकतर पेगॅससप्रकरणी मोदींचे सरकार संसदेत धादांत खोटे बोलले आहे. संयुक्त संसदीय चौकशीची मागणीदेखील त्यावेळी सरकारतर्फे फेटाळण्यात आली. ती झाली असती तर ‘न्यूयॉर्क टाईम्स’पेक्षा मोठे धक्के दिले गेले असते. अमेरिकेच्या ‘एफबीआय’ या तपास यंत्रणेने पेगॅससची खरेदी केली व देशांतर्गत पाळत ठेवण्यासाठी ते वापरले. त्यांचेही भांडे फुटले तेव्हा त्यांनी पेगॅससचा गैरवापर थांबवला. इतर अनेक देशांतही पेगॅससचा वापर झाला, पण त्या देशांत लोकशाहीचे नामोनिशाण नाही’, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
“देश लुटणाऱ्यांवर पेगॅससची निगराणी नाही, पण देशहितासाठी बोलणारे मोदींच्या अस्त्राचे शिकार झाले”
-
‘खरा हिंदुत्ववादी असता तर जिन्नांना गोळी घातली असती, गांधीजींना का मारले ?; संजय राऊत यांचा सवाल
-
पुण्यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील ५६ टक्के बालकांना पहिला डोस
-
‘या’ महिन्यात होणार पुणे, पिंपरी–चिंचवड आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका
-
‘निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे’ बॅनर संतप्त महिला भाजप कार्यकर्त्यांनी फाडले..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
