🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. असे असतांनाच राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी वाईन विक्रीचे समर्थन केले. तसेच ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच आहे, असे भुजबळ म्हणाले. दरम्यान, भुजबळांच्या या वक्तव्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच, अशा शब्दात छगन भुजबळांनी वाईन विक्रीचं समर्थन केलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचा दारू आणि वाईनचा अभ्यास व अनुभव दांडगा दिसतोय. लोक कुठेही जाऊन घेणार असतील तर सुपर मार्केटमध्ये विक्रीचा निर्णय शेअरच्या किमती वाढवायला घेतलाय?’, असा खोचक सवालही भातखळकरांनी केला आहे.
“ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच” अशा शब्दात छगन भुजबळांनी वाईन विक्रीचं समर्थन केलं आहे.
महा विकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचा दारू आणि वाईनचा अभ्यास व अनुभव दांडगा दिसतोय. लोक कुठेही जाऊन घेणार असतील तर सुपर मार्केटमध्ये विक्रीचा निर्णय शेअरच्या किमती वाढवायला घेतलाय? pic.twitter.com/e3NzRE09kd— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 31, 2022
दरम्यान, नाशिकमध्ये काल(३० जाने.)प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना भुजबळ म्हणाले की,‘अख्ख्या जगाने वाईनला हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली असून त्यामध्ये शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल. ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच आहे. त्यामुळे उगीच साप साप म्हणून भुई थोपटण्याचे काम सध्या सुरु आहे. काहीतरी विषय काढून त्याच्यावर आंदोलन करायचं हे काही बरोबर नाही’, असे भुजबळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
“देश लुटणाऱ्यांवर पेगॅससची निगराणी नाही, पण देशहितासाठी बोलणारे मोदींच्या अस्त्राचे शिकार झाले”
-
देशातील नागरिकांवर पाळत ठेवून त्यांना शत्रूसारखे वागवायचे ही कोणती रीत?- संजय राऊत
-
‘या’ महिन्यात होणार पुणे, पिंपरी–चिंचवड आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका
-
‘निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे’ बॅनर संतप्त महिला भाजप कार्यकर्त्यांनी फाडले..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
