Share

“प्रेक्षकांनी स्वत:चा चॉईस तपासून पहा, भिकार सिरीयल पाहणे बंद करा”, विक्रम गोखलेंचे वादग्रस्त वक्तव्य

Published On: 

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी मालिकांचा घसरत चाललेल्या दर्जावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “प्रेक्षकांनी अगोदर स्वत:चा चॉईस तपासून पाहावा, आणि निश्चित करावे. आपला वेळ वाया घालवू नका. त्यामुळे भिकार सिरीयल पाहणे बंद करा कारण तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील.” असे  म्हटले आहे.

प्रेक्षकांनी भिकार सिरीयल पाहणे बंद केल्यास अशा सिरीयलची निर्मिती होणार नाही, आणि मग चांगले दिग्दर्शक, नट लेखक येतील. म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, सिरीयल नक्की पहा असे आवाहन विक्रम गोखले यांनी केले आहे. ते कल्याण येथे सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलत होते.

“उत्कृष्ठ पाहा, उत्कृष्ठ अनुभवा, उत्कृष्ठ वाचा”

तसेच पुढे ते म्हणाले की, “ज्याला काही अर्थच नाही अशा मालिका, सिन्स आणि असे सगळे कलाविष्कार बघण्यात तुम्हाला काय मिळते? तुम्हाला अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, अभिनय महत्वाचा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना माझी विनंती आहे की, आधी तुमच्या चॉइसवर बंधनं घाला, तो तपासून पाहा. आपण काय पाहतोय? यामध्ये काही बुद्धीजीवी आहे का?, काही विचार आहे का? हे तपासून पाहा. उत्कृष्ठ पाहा, उत्कृष्ठ अनुभवा, उत्कृष्ठ वाचा. आणि ते मिळत नसेल तर बंद करा.” असे आवाहन विक्रम गोखले यांनी केले आहे.

“प्रसारमाध्यमं घरातील काम करत बघण्याची गोष्ट झाली”

यावेळी विक्रम गोखले यांनी प्रसारमाध्यमांनाही चांगलाच टोला लगावला आहे. प्रसारमाध्यमं ही सध्या घरातील काम करत बघण्याची गोष्ट झाली आहे. भाजी मोडता मोडता बघत रहाणे. पोराला खायला घालता घालता बघत रहाणे, घरकाम करताना बघत रहाणे. तुम्ही सिनेमागृहात केल्यानंतर असले चाळे, असले संवाद मारु शकत नाही. तिथे लोक म्हणतील आम्हाला सिनेमा बघायचा आहे, गप्प बसा किंवा बाहेर जा. तिथे ज्यापद्धतीची शांतता हवी असते तशी शांतता राखूया आपण हे बघताना. या लायकीच्या मालिका आहेत का इथे? असा सवाल करत त्यांनी सध्या चॅनेलवाले हेच म्हणणार लोकांना हे आवडतं आम्ही हेच देणार. घाल पीठ, घाल पाणी असंच चालू राहणार असे म्हटले आहे. त्यामुळे टीव्ही बघण्याचा आपला हेतू काय आहे हे ठरवा आणि भिकार मालिका बघणं बंद करा, असे३ आवाहन विक्रम गोखले यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!