Share

Chandrakant Khaire | “फुटू नये म्हणून शिंदे गटाच्या आमदारांना आणखी 5 कोटी दिले”; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

Published On: 

🕒 1 min read

Chandrakant Khaire | औरंगाबाद : शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातोय. याच पार्वश्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले, “शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. “शिंदे गटातील आमदार फुटू नयेत म्हणून या आमदारांना पुन्हा प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत”, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे.

एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. भाजपचे त्रिवेदी महाराजांबद्दल बोलत असेल तर आम्हाला राग आला आहे. शिवसेना हळूहळू आक्रमकता दाखवेल आणि या सरकारला खाली खेचेल. हे खोके सरकार आहे. ते काहीही बरळत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, कृषिमंत्री केवळ आपल्या मर्जीतला कृषि आयुक्त कसा येईल, याकडे लक्ष देत आहेत. हे सरकार केवळ खोके घेण्यात व्यस्त आहे. मात्र, शेतकऱ्यांना काहीही मदत केली जात नाही. ऐन रब्बी हंगामात त्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!