Share

Aditya Thackeray | “…हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!”, आदित्य ठाकरेंचा घणाघात

Published On: 

Aditya Thackeray | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यानंतर भाजप (BJP) नेते मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी घणाघात केला आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर देखील टीकास्त्र सोडलं असून याबाबत ट्विट केलं आहे.

इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे!, ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!, असं आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, शिवप्रताप दिनी मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका प्रसंगाशी केली होती. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही मंगलप्रभात लोढा यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. आज ठाकरे गटाने मुंबईत लोढांच्या विरोधात जोरदार निदर्शने करून त्यांचा निषेधही नोंदवला आहे.

दरम्यान, मंगलप्रभात लोढा असं बोलतील असं कधी वाटलं नव्हतं. पण ते जो पर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत त्यांना मुंबईत फिरू देणार नाही, असा इशारा खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!