Share

मोदी आता खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडणार : नवज्योतसिंग सिद्धू

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि भाजप मध्ये जोरदार आरोपांच्या फैरी झडत आहेत. तर हे आरोप – प्रत्यारोप करण्यात काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे अग्रस्थानी असल्याचे दिसते. आता पुन्हा एकदा सिद्धूने भाजपला लक्ष करीत जोरदार टोलेबाजी केली आहे. गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केवळ खोटी आश्वासन दिली आहेत. त्यामुळे मोदी आता खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडणार आहेत, असा टोला सिद्धू यांनी मोदींना लगावला आहे. यावेळी सिद्धू एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आश्वासनांचा पाढा वाचला. सिद्धू म्हणाले की, गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी आणलेली नमामी गंगे योजना २०१९ पर्यंत संपेल, असे सांगितले होते. त्यासाठी २० हजार कोटींची तरतूद केली. त्यापैकी केवळ ६ हजार कोटी रुपयेच खर्च केले.योजनेतील ट्रीटमेंट प्लांटचे काम १० टक्केच पूर्ण झाले असून, वाराणसीत गंगा आजही सर्वाधिक प्रदूषित आहे.जालियनवाला बाग हत्याकांड ट्रस्टचे अध्यक्ष स्वत: मोदी आहेत. पण पाच वर्षांत त्यांनी ट्रस्टची एकही बैठक घेतली नाही वा ट्रस्टवर एकाचीही नेमणूक केली नाही. ट्रस्टमार्फत कामे करण्यासाठी ४० कोटींची घोषणाही केली. पण तो निधी दिलाच नाही, अशी टीका त्यांनी केली.

तसेच अडीच लाख गावांमध्ये फेब्रुवारी २०१९ पर्यंत डिजिटल इंडिया योजनेद्वारे इंटरनेट कनेक्टिविटी पोहोचवू, असा दावा केला. पण अद्याप १ लाख १ गावांमध्येच इंटरनेट पोहचलेली नाही. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून २०२० पर्यंत ४० कोटी लोकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला होता. पण आतापर्यंत ४१ लोकांनाच प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून रोजगार मिळालेल्यांची संख्या ६ लाखच आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!