🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता विवेक ओबेरॉयने आज आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्या राय, सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि अभिषेक, आराध्यासोबतचे तीन फोटोज आहेत. सलमान, ऐश्वर्याच्या फोटोवर ‘ओपिनियन पोल’ लिहिले होते, ऐश्वर्या विवेकच्या फोटोवर ‘एग्झिट पोल’ लिहिले होते, तर नवरा अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबतच्या फोटोवर ‘रिजल्ट्स’ असे लिहिले होते.
https://twitter.com/vivekoberoi/status/1130380916142907392
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विवेक ओबेरॉयवर कारवाईची मागणी करत महिला आयोग यावर गप्प का असाही प्रश्न विचारला. मलिक यांनी ट्वीट केले, “भाजपा नेते आणि भाजपा समर्थक यांचा वाचाळपणा जगजाहीर आहे. भाजपा समर्थक व सिनेअभिनेता विवेक ओबेरॉयने पद्मश्री पुरस्कार प्राप्त देशातील प्रसिद्ध महिलेबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. एखाद्या महिलेबाबत अशा प्रकारचे अपमानास्पद ट्वीट करूनही महिला आयोग यावर गप्प का?”
भाजपा नेते आणि भाजपा समर्थक यांचा वाचाळपणा जगजाहीर आहे. भाजपा समर्थक व सिनेअभिनेता @vivekoberoi याने पद्मश्री पुरस्कार प्राप्त देशातील प्रसिद्ध महीलेबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. एखाद्या महिलेबाबत अशा प्रकारचे अपमानास्पद ट्वीट करूनही महिला आयोग यावर गप्प का? – @nawabmalikncp pic.twitter.com/44nCQUeV0Q
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 20, 2019
मात्र विवेकचे हे ट्विट आल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. विवेक ओबेरॉयने विवेकशून्य ट्विट करून आपली अक्कल ठीकाण्यावर आहे का असा सवाल विचारण्यास भाग पडल आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

