नागपूर: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष चांगलेच कामाला लागलेले आहेत. सर्वकाह पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीनेही महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरु केलीये. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आजपासून चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. त्यांचा हा दौरा राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे.
विदर्भा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे तिथे राष्ट्रवादीचे मिशन विदर्भ महत्वाचं ठरणार आहे. विदर्भामध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीने हे मिशन सुरू केले आहे. महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या या विदर्भा दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या दौऱ्यात ते तेथील कार्यकर्ते व नेत्यांच्या भेटी घेणार असून सभा देखील घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार हे आज बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास नागपुरात पोहोचतील. त्यानंतर ते व्यापाऱ्यांसोबत बैठक, पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील. शरद पवार यांच्या दौऱ्यामुळं विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळणार आहे. त्याच सोबत राष्ट्रवादीचे हे मिशन विदर्भ भाजपच्या बालेकिल्ल्यात आपली पकड मजबूत बनवू शकेल का, याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या:
- लहान मुलांच्या लसीकरणासाठी राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी
- इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू, लक्ष्य सेनची विजयी सुरुवात
- मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा: विदर्भाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
- टीम इंडियामध्ये कोहलीच्या भूमिकेबाबत रोहितचे स्पष्टीकरण; म्हणाला..
- आम्ही राज्यातील हिंदूंची अवहेलना थांबविणार; सोमय्यांचा यशोमती ठाकूर यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
