नवी दिल्ली: सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी—२० क्रिकेट स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व लढतीत विदर्भाने महाराष्ट्राला सात गडी आणि १३ चेंडू राखून पराभव करत महाराष्ट्राने दिलेले १५८ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत गाठून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले.
कर्णधार अक्षय वाडकरने नाबाद ५८ धावा आणि सलामीवीर अथर्व तायडेनी ५६ धावा करत दुसऱ्या गडय़ासाठी ९६ धावांची भागीदारी केली. तर जितेश शर्माने अवघ्या ७ चेंडूंत २८ धावा फटकावून संघाचा विजय साकारला. आता गुरुवारी विदर्भाचा राजस्थानशी सामना होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्राने ८ बाद १५७ धावांपर्यंत मजल मारली. ऋतुराजच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणारा नौशाद शेख (०), अनुभवी केदार जाधव (६), अझिम काझी (१५) अपयशी ठरले. राहुल त्रिपाठीने ४५ चेंडूंत ६६ धावांची खेळी साकारली. त्याने यश नाहरसह (२९) दुसऱ्या गडय़ासाठी ६४ धावांची भर घालून महाराष्ट्राला दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- भारत-न्यूझीलंडचा आज पहिला टी-२० सामना; रोहित-राहुल पर्व सुरु
- इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू, लक्ष्य सेनची विजयी सुरुवात
- ‘विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय होणार’
- एसटीचा संप संपता संपेना; औरंगाबाद विभागात संपकऱ्यांनी केला टाळ-मृदुगांचा गजर!
- पोलिसांचा विरोध तरीही अमरावती दौऱ्यावर किरीट सोमय्या ठाम!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

