Share

लहान मुलांच्या लसीकरणासाठी राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: कोव्हिशिल्डच्या दोन लसमात्रांमधील अंतर कमी करावे, लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू करावी आणि ‘बुस्टर डोस’ देण्याबाबत विचार केला जावा, अशा तीन महत्त्वाच्या मागण्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली आहे.

दोन्ही मंत्र्यांच्या २० मिनिटे झालेल्या भेटीमध्ये महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीची माहिती टोपे यांनी मंडाविया यांना दिली. करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये राज्य सरकारने केलेले प्रतिबंधात्मक उपाय व उपचारांच्या कामांचे तसेच, लसीकरणाच्या कामांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कौतुक केले. मुंबईमध्ये पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान कोव्हॅक्सिन लशीची दुसरी मात्रा २८ दिवसांनंतर दिली जाते तर, कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा ८४ दिवसानंतर दिली जाते. या दोन्ही लशींच्या दुसऱ्या मात्रेतील अंतरांचा कालावधी समान असावा. कोव्हिशिल्डच्या दोन मात्रांतील अंतरही कमी होणे गरजेचे आहे. तसे केल्यास राज्यातील आणि पर्यायाने देशातील संपूर्ण लसीकरणाचे लक्ष्य वेगाने गाठले जाईल, हा प्रश्न राजेश टोपे यांनी केंद्राकडे मांडला आहे. तसेच हृदयविकाराचा आजार असलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी केंद्राकडे ‘कॅथ लॅब’ची मागणीही टोपे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!