🕒 1 min read
बाली : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि युवा लक्ष्य सेनने इंडोनेशिया मास्टर्स बँडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) विजयी सलामी दिली. मात्र याचवेळी पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचे स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
जागतिक स्पर्धेतील गतविजेत्या पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या सुपानिदा कातेथोंगवर २१-१५, २१-१९ अशी सरळ गेममध्ये मात देत विजय मिळविला. मात्र पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये कातेथोंगने सिंधूला चांगली झुंज दिली. यावेळी १९-१८ अशी एका गुणाची आघाडी असताना सिंधूने २१-१९ असा गेम जिंकला.
दरम्यान आता पी. व्ही. सिंधूचा पुढील फेरीत स्पेनच्या क्लारा अझुर्मेंडीशी सामना होणार आहे. तर पुरुष एकेरीत लक्ष्यने जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या जपानच्या कांटा त्सुनेयामाचा २१-१७, १८-२१, २१-१७ असा पराभव केला. आता दुसऱ्या फेरीत त्याच्यापुढे जपानच्या केंटो मोमोटाचे आव्हान असणार आहे. मात्र सात्त्विक आणि चिराग या जोडीचा ओंग येव सिन आणि टेओ ए यिने १७-२१, १५-२१ असा पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या
- भारत-न्यूझीलंडचा आज पहिला टी-२० सामना; रोहित-राहुल पर्व सुरु
- कायद्याचं राज्य नव्हे, ‘काय ते द्या’चं राज्य; फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला
- ‘विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय होणार’
- एसटीचा संप संपता संपेना; औरंगाबाद विभागात संपकऱ्यांनी केला टाळ-मृदुगांचा गजर!
- पोलिसांचा विरोध तरीही अमरावती दौऱ्यावर किरीट सोमय्या ठाम!

