Share

टीम इंडियामध्ये कोहलीच्या भूमिकेबाबत रोहितचे स्पष्टीकरण; म्हणाला..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आजपासून भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या नव्या कर्णधार-प्रशिक्षक जोडीच्या पर्वाला प्रारंभ होणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अपयशानंतर न्यूझीलंड संघ थेट भारतात पोहचला आहे. तर भारतीय संघ पहिल्या टी-२० सामन्यात वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. दरम्यान न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या सिरीजपूर्वी झालेल्या प्रेस क्रॉन्फरन्समध्ये कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीची काय भूमिका असेल याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

विराट कोहली आतापर्यंत जे करत आला होता तसंच करेल आणि त्याची तशीच भूमिका असेल. टीमच्या नजेरतून तो एक मोठा प्लेअर आहे. आणि त्यानुसार प्रत्येक खेळाडूची भूमिका वेगळी असते. असे स्पष्टीकरण रोहित शर्माने दिले आहे.

दरम्यान विराट कोहलीने टी-20 फॉर्मेटचं कर्णधारपद सोडलं आहे. त्यातच न्यूझीलंडच्या तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये त्याला आराम देण्यात आला आहे. यानंतर आता विराट कोहली थेट दुसऱ्या टेस्टवेळी टीममध्ये पुनरागमन करणार आहे. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने कसोटी मालिकेपूर्वी पुरेशी विश्रांती मिळावी, या हेतूने ट्वेन्टी-२० मालिकेत न खेळण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज टिम साऊदी न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे. तर कोहली, शिखर धवन यांसारख्या प्रमुख फलंदाजांच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर या युवा फळीच्या कामगिरीकडे आज होणाऱ्या सामन्यात सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!