Share

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची टीम लातूर मध्ये दाखल, पालकमंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा

Published On: 

लातूर : लातूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत अडकलेल्या अनेक नागरिकांना जिल्हा प्रशासनाने बाहेर काढले आहे. अजूनही पावसाची शक्यता लक्षात घेऊन पालकमंत्री अमित देशमुख यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचरण करण्याची सूचना केली होती. ती टीम आज लातुरात पोहचली आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख हे वेळोवेळी प्रशासनाला सूचना देत आहेत. त्यानुसार सकाळ पासून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन टीम कार्यरत असून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचविले आहे.
संध्याकाळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची टीम आली असून पालकमंत्री अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी त्यांच्या बरोबर चर्चा केली. या टीमला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती, पूरग्रस्त गावे याची माहिती देण्यात आली असून आता ही टीम प्रशासनाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करेल.

लातूर जिल्ह्यातील मांजरा आणि तेरणा दोन्ही प्रकल्पापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे अडकलेल्या नागरिकांना सुखरुप काढण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या पुढील काळातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!