Share

नटराजनची कामगिरी बुमराह सारखीच, सेहवागने शेअर केला दोघांबद्दलचा अजब योगायोग

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टी. नटराजनने बुमराह प्रमाणेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावर नटराजनची सुरुवातीला नेट बॉलर म्हणू टीममध्ये निवड झाली होती. त्यानंतर वरुण चक्रवर्ती जखमी झाल्याने त्याची सुरुवातीला टी 20 मध्ये निवड झाली. वन-डे सीरिज सुरु होण्याच्या काही तास आधी नटराजनची नवदीप सैनीचा बॅक अप बॉलर म्हणून वन-डे टीममध्ये निवड करण्यात आली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी (4 डिसेंबर) कॅनबेरा यथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाने 11 धावांनी विजय मिळवला. टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने पहिल्याच सामन्यात शानदार गोलंदाजी केली आणि तीन बळी टिपले.

एवढेच नव्हे, तर बुधवारी(2 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाच्या वनडे सामन्यातही त्याला 2 बळी घेण्यात यश आले होते. त्याचे प्रदर्शन पाहून भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने टी नटराजनची तुलना भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशी केली आहे. टी. नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

सेहवागने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात टी नटराजन आणि जसप्रीत बुमराह या दोघांचेही फोटो शेयर करत आकडेवारीच्या माध्यमातून या दोघांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत घडलेल्या काही सारख्या गोष्टी सांगितल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CIYaMOcgmZL/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!