Share

दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झालेला नटराजन झाला भावूक; उर्वरित सामन्यासाठी दिल्या संघाला शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील हैदराबाद संघाने नुकताच पहिला विजय मिळवला आणि विजयाचे खाते उघडले. मात्र या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाचा महत्वाचा युवा गोलंदाज टी नटराजन गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे हैदराबाद संघाला खुप मोठा धक्का बसला आहे.

यांनतर नटराजनने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या दुखापतीविषयी माहिती दिली आहे. या व्हिडीओत तो म्हणतो. ‘आयपीएल स्पर्धेतुन बाहेर पडल्याने मला वाईच वाटत आहे. मागील हंगामात चांगली कामगीरी केल्याने भरतीय संघाचे दरवाजे माझ्यासाठी उघडले गेले होते. त्यामुळे या हंगामात माझ्याकडून विशेष अपेक्षा होत्या मात्र दुर्दैवाने गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे मला उर्वरित स्पर्धेत भाग घेता येणार नाही.’

यावेळी तो बोलताना थोडा भावूक झाला,’मला दिलेल्या पाठींब्यासाठी मी हैदराबाद संघातील माझे सहकारी आणि संघ व्यवस्थापन यांचे आभार मानतो. तसेच हैदराबाद संघाला उर्वरीत सामन्यासाठी खुप शुभेच्छा’ नटराजनने हैदराबादकडून सुरुवातीचे २ सामने खेळले होते. त्यानंतर तो दोन सामने संघाबाहेर होता. टी नटराजनने आयपीएल २०२० मध्ये हैदराबादकडून १६ सामन्यांत ३१.५ च्या सरासरीने १६ गडी बाद केले होते. एका हंगामात सर्वाधिक ६५-७० यॉर्कर चेंडू फेकल्याने तो यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाऊ लागला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!