मुंबई : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गळती आटोक्यात आली असून वैद्यकीय सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. गंभीर बाब म्हणजे या रुग्णालयात गंभीर प्रकृती असलेले सुमारे १२० हुन अधिक रुग्ण हे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर होते. आतापर्यंत या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण गंभीर असून तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती विदारक असल्याचं दिसून आलं.
ऑक्सिजन पुरवठा मधे त्रुटी, महाराष्ट्रात नाशिक हॉस्पीटल २२ कोवीड रुग्णांचे मृत्यू. १२ एप्रिल नालासोपारा येथे ६२ मृत्यू, १० एप्रिल ठाणे येथे २६ रुग्णाचा जीव धोक्यात, १९ एप्रिल मुंबईत १६३ रूग्णांना हलविले…. आरोग्य मंत्री राजेश टोपे जवाबदारी स्वीकारणार का!!??@BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 21, 2021
दरम्यान, या दुर्घटनेननंतर आता अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नाशिक दुर्घटनेसह याआधी घडलेल्या दुर्घटनांमध्ये ज्या रुग्णांना प्राण गमवावे लागले त्यांची आकडेवारी सादर करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जबाबदारी स्वीकारणार का ? असा सवाल केला आहे. ‘ऑक्सिजन पुरवठा मध्ये त्रुटी, महाराष्ट्रात नाशिक हॉस्पीटल २२ कोविड रुग्णांचे मृत्यू. १२ एप्रिल नालासोपारा येथे ६२ मृत्यू, १० एप्रिल ठाणे येथे २६ रुग्णाचा जीव धोक्यात, १९ एप्रिल मुंबईत १६३ रूग्णांना हलविले…. आरोग्य मंत्री राजेश टोपे जबाबदारी स्वीकारणार का??’ असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मी देशासाठी मरतो, पण माझ्या पत्नीला रुग्णालय मिळेना; BSF जवानाची हतबलता
- महाराष्ट्र शोकमग्न आहे! मृत रुग्णांच्या नातेवाईकांचे अश्रू कसे पुसू ? – मुख्यमंत्री
- अहो सरकार तुम्हाला लाज तरी कधी वाटणार ! नाशिक दुर्घटनेत शासन-प्रशासनाकडून सामान्यांचा खून…
- ‘केद्रांची लसीकरण मोहीम नोटबंदीप्रमाणेच, फायदा केवळ उद्योपतींनाच’, राहुल गांधींचा हल्लाबोल
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं दुःख !


