Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं दुःख !

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गळती आटोक्यात आली असून वैद्यकीय सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. गंभीर बाब म्हणजे या रुग्णालयात गंभीर प्रकृती असलेले सुमारे १२० हुन अधिक रुग्ण हे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर होते. आतापर्यंत या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण गंभीर असून तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती विदारक असल्याचं दिसून आलं.

अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना हा प्रकार लक्षात येताच स्वतः रुग्णाजवळ धाव घेऊन छातीवर दाब देऊन त्यांना जागवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, रुग्ण प्राण सोडत असल्याने नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला आहे. दरम्यान, यानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती अधिकारी देत आहेत.

या दुर्घटनेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ‘नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. पालकमंत्री छगन भुजबळ आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल.’ असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!