🕒 1 min read
मुंबई : निवडणूक आयोगाने राज्यातील सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता, त्यापैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली होती. याची आज मतमोजणी झाली असून दोन्ही जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात नितेश राणेंनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’जोपर्यंत महाराष्ट्र काँग्रेसचा ‘पप्पू’ आणि शिवसेनेचा ‘पेंग्विन’ त्यांच्या पक्षांचे नेतृत्व करत आहे, तोपर्यंत भाजपाला कोणीही थांबू शकत नाही. सर्व MLC विजेत्यांचे अभिनंदन’, असे राणे म्हणाले आहेत.
Till the “Pappu” of Maharashtra Congress n “Penguin” of Shiv sena r leading their parties.. No 1 can stop @BJP4Maharashtra !
Congratulations to all the MLC winners!! @Dev_Fadnavis @ChDadaPatil— Nitesh Rane (@NiteshNRane) December 14, 2021
दरम्यान, अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. वसंत खंडेलवाल यांना ३३८ तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना ३२८ मतं मिळाली आहेत.तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलावा लागला होता. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून नागपूर विधान परिषदेच्या जागेवर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली. काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. तर, छोटू भोयर यांना १ मत मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७८ मतांचा कोटा पूर्ण केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला’
- …हा काँग्रेससारख्या ‘सेक्युलर’ पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे- संजय राऊत
- ‘अल्पसंख्यांकांचे चोचले पुरवणे हेच काँग्रेसचे धोरण’
- ‘मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला खपवून घेणार नाही’
- ‘बूंद से गईं सो हौद से नही आती’, म्हाडाच्या भरती प्रक्रियेवरून भातखळकरांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
