पंढरपूर: थकीत ऊस बिलाच्या राकमेबाबत निवेदन द्यायला गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर करमाळा तालुक्यातील मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल (Digvijay Bagal) यांनी हात उचलला होता. त्याचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी दिग्विजय बागल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, शेतकऱ्यांचे पैसे थकवून उलट हेच लोक गुंडगिरी करत आहेत. चोर तो चोर आणि वर शिरजोर असा हा प्रकार आहे. मकाई साखर कारखान्याच्या विरोधात आम्ही आक्रमक होण्याचं कारण त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. दादागिरी केली. पण आम्ही शेतकऱ्यांचे बच्चे आहोत. असल्या दादागिरीला भीक घालणार नाही.
पुढे बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, तलवार आणि गुंडगिरीच्या जोरावर राज्य करता आलं असतं तर दाऊद देशाचा पंतप्रधान झाला असता आणि अरुण गवळी मुख्यमंत्री झाला असता. मुळात शेतकऱ्यांच्या मनात असंतोष आहे हे या लोकांनी लक्षात घ्यावं. यापुढंही त्यांनी असंच वागण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी गावागावांत त्यांना पाय ठेवू देणार नाही, असा इशारा रविकांत तूपकर यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या:
- मी निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने; फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘काँग्रेसचा पप्पू आणि शिवसेनेचा पेंग्विन भाजपला थांबवू शकत नाही’
- हा विजय हक्काचा तरीही आमच्यासाठी स्पेशलच-चंद्रकांत पाटील
- …म्हणून आम्ही निवडणूक हारलो; कॉंग्रेसचा अजब दावा
- कर्नाटकात मराठी भाषिक नेत्यावर शाई फेकल्याप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

