🕒 1 min read
नागपूर : महाराष्ट्रातील विधानपरिषदेसाठी (स्थानिक स्वराज्य संस्था) घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. नागपूर (Nagpur) विधानपरिषदेच्या जागेवर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे विजयी झाले आहेत. काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा दिला होता. देशमुख यांचा पराभव करत बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
आज माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड विजय मिळाला आहे. मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला. बावनकुळेंच्या विजय महाविकास आघाडीला चपराक आहे. तिकडे अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. एकूणच विधानपरिषदेच्या 6 पैकी 4 जागी भाजप निवडून आली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळे विजय मिळू शकतात हे गणित मांडलं गेलं ते चुकीचं ठरलं. महाराष्ट्रातील जनता भाजपच्या पाठिशी आहे, भविष्यातही आम्हाला आशिर्वाद मिळेल. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा भविष्यातील विजयाची नांदी आहे. आमचे राष्ट्रीय नेते मोदी, अमित शाह, नड्डा यांचे आभार, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Many congratulations to my colleague @cbawankule on being elected to Maharashtra’s Legislative Council.
Wishing you the very best!
महाराष्ट्र विधानपरिषदेवर विजयी झाल्याबद्दल माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांचे खूप खूप अभिनंदन!
पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 14, 2021
मी विशेष आभार मानतो नितीन गडकरी यांचे, त्यांच्या नेतृत्त्वात आम्ही लढलो आणि आम्हाला विजय मिळाला. विजयाच्या मालिकेची सुरुवात यानिमित्ताने झाली आहे. महाविकास आघाडीची मतं ही नागपूर आणि अकोल्यात मिळाली. ज्यांनी मतं दिली त्या सर्वांचे आभार मानतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकात मराठी भाषिक नेत्यावर शाई फेकल्याप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया
- काँग्रेस पक्षाला स्वत:ची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचं नेतृत्त्व काय करणार – प्रवीण दरेकर
- विधान परिषदेच्या दोन्ही जागांवर भाजपाचा विजय; ‘मविआ’ला मोठा फटका
- नाव गांधीचे सांगायचे पण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना…- केशव उपाध्ये
- अकोल्यात शिवसेनेचा पराभव, भाजपाचे वसंत खंडेलवाल विजयी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
