Share

हमीभावानं खरेदी सुरूच राहील; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांची ग्वाही

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील आठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांचे जत्थे दाखल होत आहेत. तर दुसरीकडे चर्चेच्या पाचव्या फेरीनंतरही सरकारला शेतकऱ्यांचं समाधान करण्यात अपयश आलं आहे.

दरम्यान, शेतमालाची हमीभावानं खरेदी सुरूच राहीलअशी ग्वाही केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पुन्हा दिली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी काल शेतकऱ्यांसोबत चर्चेच्या पाचव्या फेरीत दिलं.

काल शेतकरी प्रतिनिधींनी कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर सरकारनं या कायद्यांच्या सर्व घटनात्मक तरतूदी स्पष्ट केल्या.बाजार समित्या, खाजगी बाजार आणि मार्केट यार्ड यांच्यात समन्वय असावा तसंच बाजार समित्यांबाहेर केलेल्या व्यवहारांचीही योग्य नोंदणी होणं आवश्यक आहे असं मत शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केलं.

दरम्यान, यावेळी शेतकरी संघटनांनी आपले विचार व्यक्त केल्याबद्दल तोमर यांनी आभार मानले आणि सरकार नेहमीच त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार आहे असं आश्वासन दिलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!