यवतमाळ: कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्याने लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन, त्याचबरोबर अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या ऑफिसला देखील बळी पडत असतात. याचा फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर येत आहेत.
अनेकदा सायबर फ्रॉड प्रकरणात आपणच जबाबदार ठरतो. एखाद्या चुकीच्या लिंकवर, फ्रॉड साईटवर जाऊन केलेल्या शॉपिंग किंवा इतर काही गोष्टींमुळे फ्रॉडला बळी पडतो. तसेच गुगलवर सर्च करून अनेकदा ग्राहक त्याठिकाणी आलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन करतात. काही वेळा हा नंबर चुकीचा असू शकतो. ज्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. असाच एक प्रकार यवतमाळमधील एका महिलेच्या बाबत घडला आहे. या महिलेला बँकेचा कस्टमर केअर नंबर गुगलवर सर्च करणं चांगलंच महागात पडलं आहे.
स्टेट बँकेत खातं असणाऱ्या महिलेने बँकेच्या अॅपबद्दल माहिती मिळवण्यासाठी गुगलवर स्टेट बँकेचा कस्टमर केअर नंबर सर्च केला. 933907421 हा कस्टमर केअर नंबर असल्याचं गुगलवर समजलं. या नंबरवर संपर्क केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने महिलेला काही प्रोसेस फॉलो करण्यास सांगितली आणि महिलेने सांगितल्याप्रमाणे गोष्टी केल्या.
कस्टमर केअर बोलत असल्याचं सांगत फ्रॉडस्टरने महिलेला क्विक शेअर अॅप डाउनलोड करण्यास सांगितलं. त्यानंतर बँक पासबुकचा फोटो अपलोड करायला लावला, ATM पीन मागितला आणि तुमचं काम झालं असल्याचं समोरून सांगण्यात आलं. काही वेळात त्यांच्या खात्यातून 2 लाख 37 हजारांची रक्कम कट झाली आणि त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचं समजलं. पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खबरदरी म्हणून बँक वेळोवेळी फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी फोनमध्ये कधीही बँकिंग पासवर्ड, युजरनेम किंवा एटीएम पिन सेव्ह करू नका. जर असे असेल तर लॉक फीचर जरूर ठेवा. फोन आणि डेटाची सिक्योरिटीसाठी सर्वात आधी फोनला आपल्यापासून दूर ठेवू नका. तुम्ही ज्या अ;ॅपचा वापर करत नसाल तर ते डिलीट करा. तसेच कोणत्याही सार्वजनिक वायफाय नेटवर्क्सचा वापर करू नका. त्याला फोन कनेक्ट करू नका,अशी माहिती देत असतात. तरी देखील अनेक लोक या फसवणुकीला बळी पडतात.
महत्वाच्या बातम्या
- ‘…आम्ही एकत्र पुढे जाऊ’ ; पराभवानंतर कोहलीचे भावनात्मक ट्विट
- कर्णधार कोहलीचा ‘बेस्ट ऑफ थ्री’ला पाठिंबा, म्हणाला…
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

