Share

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून पश्चिम बंगालमधील शेतकरी वंचित : मोदी

Published On: 

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यामुळं शेतकऱ्यांना अधिक लाभ आणि अधिकार मिळत असून, शेतकऱ्यांना मुक्तपणे कृषी उत्पादन विक्रीचं स्वातंत्र्य लाभलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहा राज्यातल्या शेतकाऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.

देशातील जनता आणि मोठ्या संख्येने असलेले शेतकरी सर्व परिस्थिती जाणून आहेत, असं मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. देशाच्या अन्नदात्याला उन्नत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र देशभरातल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून पश्चिम बंगालमधील शेतकरी वंचित असल्याबद्दल मोदी यांनी खेद व्यक्त केला.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा, दूसरा हप्ता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मोदी यांनी काल वितरीत केला. देशातल्या नऊ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 18 हजार कोटींहून अधिक रक्कम थेट जमा करण्यात आली. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना म्हणजे सुशासनाचा पुरावाच असल्याचं सांगताना मोदी म्हणाले .

दरम्यान, मोदींच्या या कार्यक्रमावर कॉंग्रेसने टीका केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या दिवशी इव्हेंटबाजी करत ९ कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपये दिल्याचा मोठ्या थाटात गवगवा केला. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत एक महिन्यापासून हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत. नवीन कृषी कायदे रद्द करावेत ही त्यांची मागणी आहे परंतु त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी आपण शेतकऱ्यांचे किती कैवारी आहेत हे दाखवण्यासाठी इव्हेंटबाजी करत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये देण्याची ही योजना म्हणजे शेतकऱ्यांना ‘आवळा’ देऊन आपल्या उद्योजक मित्रांना ‘कोहळा’ देणारी योजना आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!