Share

विभाजनवादी लोक बिहारमध्ये पुन्हा जंगल राज आणू पाहत – मोदी

Published On: 

पटना- केंद्रातील एनडीए सरकार देशभऱातील गरीबांसाठी काम करत असल्याचं ज्येष्ठ भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  काल बिहारमध्ये मोतिहारी आणि बाघा इथं निवडणूक प्रचार सभांमध्ये बोलताना सांगितलं. कोरोना लॉकडाउनच्या काळात बिहारीमधील स्थलांतरित आणि गरिबांच्या मदतीसाठी राज्यातील संयुक्त जनता दल – प्रणित एनडीए सरकारनं केलेल्या उपायांची माहिती मोदी यांनी यावेळी दिली.

भ्रष्ट, नक्षल समर्थक आणि विभाजनवादी लोकांनी या निवडणुकीत हातमिळवणी केली असून बिहारमध्ये पुन्हा जंगल राज आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप मोदी यांनी केला. एनडीए सरकारनं राज्यातील विकासावर लक्ष केंद्रित केलं तर विरोधक पक्षांचे नेते केवळ त्यांच्या जागा वाचवण्याचा विचार करत होते, अशी टीका त्यांनी केली.

समस्तीपूर येथील सभेत ते म्हणाले की, राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकीकडे लोकशाही मानत असताना दुसरीकडे विरोधक घराणेशाहीचे राजकारण करीत आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा एकतरी नातेवाईक राज्यसभेवर आहे का, मोदींचा एकतरी नातेवाईक संसदेत आहे का, असे त्यांनी विचारले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपला. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला मतदान झालं तर उर्वरित दोन टप्प्यात 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी 10 नोव्हेंबरला होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!