🕒 1 min read
पटना: आम्ही जर सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल, असं म्हणत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी अनेकदा भाजपावर यावरून टीका केली होती. त्यामुळे आता राजनाथ सिंह यांनी हल्लाबोल केला आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. याच दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पाटणा आणि गोपालगंजमधील निवडणूक सभांना संबोधित केलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
काँग्रेससह काही राजकीय पक्ष देशाच्या सैन्याच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. चीनने भारताची १२०० चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली असं काँग्रेस म्हणत आहे. पण आपण जर सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविकासआघाडी सरकारने शरद पोंक्षे यांना विधान परिषदेत पाठवू नये- सचिन खरात
- मोबाइलला नेटवर्क नाही म्हणून त्यांनी गावच काढले विकायला !
- संज्याचा पुढचा चित्रपट ‘एक शिवसेना थी’
- शेतकरी कायद्यामागील मोदी सरकारचा हेतूच शंकास्पद : पाटील
- जाणून घ्या देशात कोरोना बाधितांच्या संख्येत खरच घट होत आहे का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
