मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा ही २५ मे.टनावरून वाढवून १५०० मे.टन एवढी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीयग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पाठवले आहे.
सध्याची 25 मेट्रिक टन कांदा खरेदीची मर्यादा वाढवून ती 1500 मेट्रिक टनांपर्यंत वाढवावी अशी मागणी ठाकरे यांनी पत्रातून केली आहे. या निर्बंधांमुळे कांदा लिलाव बंद झाले असून, सर्वसामान्यांना त्याची झळ बसत असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
केंद्र सरकारने एपीएमसीतील कांदा खरेदीच्या तारखेपासून ग्रेडिंग पॅकेजिंग साठी ३ दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधी खूप कमी असून तो सात दिवसांचा करावा अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.
जीवनावश्यक वस्तू कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाऱ्यांसाठी २५ मेट्रीक टन तर कांदा व्यापाऱ्यांसाठी २ मेट्रीक टन साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापारी दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊत यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरसा दाखवला : अवधूत वाघ
- तेव्हाही सांगितलं होतं अन् आजही सांगतो मी शिवसेना सोडणार नाही – केसरकर
- जीडीपीबद्दल बोलण्याआधी जीडीपीचा फुल फॉर्म सांगा, केसरकरांचा राणेंना टोला…
- शेतक-यांना उद्धवस्त करणारे हे कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील : थोरात
- जाणून घ्या देशात कोरोना बाधितांच्या संख्येत खरच घट होत आहे का ?


