टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान परदेश दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात आणि बहिरीन या देशांना या दरम्यान ते भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी द्विपक्षीय तसेच परस्पर हितांच्या आंतरराष्ट्रीय मुद्यांवर ते चर्चा करणार आहेत.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये बियारेत्ज येथे ४५ व्या जि-७ राष्ट्रांच्या बैठकीला उपस्थित राहतील. अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव टी.एस.तीरुमर्ती यांनी दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी फ्रान्समध्ये पोहोचतील. त्याच दिवशी त्यांची सायंकाळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुअल मॅक्रो यांच्याशी भेट होणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये वैयक्तिक चर्चा झाल्यानंतर पुन्हा शिष्टमंडळ स्तरावरची बैठक होईल.
दरम्यान या दौऱ्यातचं पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. तसेच एअर इंडियाच्या दोन विमान अपघातामधील मृतांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांच्या निमंत्रणामुळे फ्रान्स दौऱ्यावर जात आहेत.
परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सहकार्या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमध्ये संरक्षण, नौकावहन, अंतराळ सहकार्य, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर चर्चा होणार आहे. फ्रान्ससोबत जैतापूर अणूऊर्जा योजना पुढे घेऊन जाण्यावर चर्चा होणार आहे. भारत आणि फ्रान्स आंतरराष्ट्रीय सौर संबंध पुढे घेऊन जाण्याच्या विचारात आहे.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीं हे संयुक्त अरब अमिरातला जातील. संयुक्त अरब अमिरातशी असलेले मैत्रीचे संबंध आणि मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. अमिरातमधून पंतप्रधान मोदी २४ ऑगस्ट रोजी बहरीनला रवाना होतील. बहरिनला भेट देणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. बहरीनचे शेख हमाद बिन ईसा अल खलीफा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विशेष मेजवानीचे आयोजन केले आहे. या दोऱ्यांच्या माध्यमातून दोन्ही देशांचे संबंध आणखी मजबूत करण्याची संधी मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करण्याचे काम सरकार करतंय : अजित पवार
का म्हणतात आदित्य ठाकरेंना ‘पेंग्विन’ ? धनंजय मुंडेंनी सांगितले रहस्य
फडणवीस पोलखोल यात्रेवरून कॉंग्रेसमध्ये मतभेद ?


