टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. या यात्रेत राष्ट्रवादीकडून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका होताना दिसत आहे. तसेच सरकारवर वेगवेगळे आरोपही केले जात आहेत.
शिवस्वराज्य यात्रेच्या कारंजा येथील सभेत बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोज महाराष्ट्रात ५ ते ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत. १६ हजार शेतकरी महिला विधवा झाल्या आहेत. संसार उध्वस्त होत आले आहेत. गरीबांना गरीब करण्याचे काम सरकार करत आहे असा आरोप केला आहे.
तसेच पुढे बोलताना माणसं फोडण्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करत आहेत. आमदार कर्नाटकचे संरक्षण मात्र महाराष्ट्र सरकारचे होते. ज्यांना तुम्ही बसवलं त्यांनी आपले संसार बुडवले आहेत. यासाठी यांना निवडून दिले आहे का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी ‘तुम्हाला जगणं मुश्किल होणार आहे यात सुधारणा करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात संधी येणार आहे. विचार करा व आघाडीचे सरकार निवडून द्या असे आवाहन केले. राज्यात आघाडी सरकार आल्यावर कोणकोणत्या सुविधा देणार हे सुद्धा अजित पवारांनी स्पष्ट केले.
- शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नागरिकांच्या मागण्यांचे आणि व्यथांचे निवेदन केले सादर
- २०-४० कोटी रुपये देवून आमदारांना फोडलं जातंय – अजित पवार
- राजे ती भीक नाही, जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे : तावडे
- भाजप-सेनेचे हे दळभद्री सरकार उलथून टाकायचे आहे – धनंजय मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

